ज्यांच्याकडून आपण जमीन घेत आहात त्यांचे सातबारा वरती नाव आहे का?
सातबारा वरती कोणत्याही प्रकारचा बोजा आहे का?
इतर हक्कांमध्ये जमीन विक्रीसाठी परवानगी आहे का कोणत्याही प्रकारचा शेरा असल्यास त्याची चौकशी करा व ते पेपर पहा
NA ऑर्डर आहे का ?
तुमच्या ओळखीच्या वकिलाकडून त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट घ्या त्यामध्ये आपल्याला ती जमीन दुसऱ्या कोणाला विकली आहे का हे समजेल
सविस्तर वृत्त:
गणेश घाडगे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे गेले काय महिन्यात एक व्यक्ती खरेदीखत करण्यासाठी आले त्या व्यक्तींनी वाघोली येथे प्लॉटची बुकिंग केली होती त्यांना खरेदीखत करून त्यांचे सातबारा वरती नाव लावायचे होते.
सदरील खरेदीखत घेऊन सामाजिक कार्यकर्ते सह दुय्यम निबंधक कार्यालय मध्ये गेले तिथे गेल्यानंतर खरेदीखत दुय्यम निबंधकास पाहण्यासाठी दिले त्यांनी ते खरेदीखत पाहिल्यानंतर आम्हास सांगितले ह्या गट नंबर मधील जमिनीचा कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये असे निर्देश व आदेश आम्हास सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर कार्यालयाकडून मिळाले आहेत
सामाजिक कार्यकर्ते त्यानंतर सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर यांच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांना असे समजले सदरील मालमत्ता ही पी ए सी एल कंपनीची आहे व सुप्रीम कोर्टाने एक समिती नेमून सदरील जमीन विक्री करू नये म्हणून पुणे जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत ते आदेश व पेपर आम्ही पाहिले त्यामध्ये हवेली प्रांत यांनी २०२३ रोजी जून मध्ये आदेश पारित करून सदरील वाघोली मधील पीएसीएल कंपनीच्या मालमत्तेवर विक्री करण्यास बंदी असा शेरा टाकण्याचे आदेश दिले आहेत
सामाजिक कार्यकर्ते गणेश घाडगे यांनी त्या लोकांना सांगितले सदरील जमिनींचे खरेदीखत विक्री व्यवहार करण्यास बंदी आहे. आपण ज्यांच्याकडे जमीन टोकन दिले आहे त्यांच्याकडून परत घ्या . असे बरेच नागरिकांसोबत वाघोली मध्ये घडत आहे ते जमीन घेत आहेत प्लॉटिंग व्यवसायिकाला टोकन देत आहेत पण अध्याप जमिनीची खरेदी होत नाही प्लोटींग व्यवसायिक तारीख पे तारीख देत आहे याबद्दल गणेश गोरख घाडगे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केली आहे तसेच पीएमआरडीए कडे देखील अनाधिकृत प्लॉटिंग वर कारवाई होण्यासाठी लेखी स्वरूपामध्ये तक्रार दाखल केली आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांची मागणी आहे यावर काय होईल कारवाई होईल का? प्रशासन याकडे पाहणार आहे का ?असे अनेक प्रकार पुण्यामध्ये चालू आहेत जिल्हाधिकारी हवेली प्रांत अधिकारी व पीएमआरडीए यांनी कारवाई करण्याची गरज आहे
स्वच्छ पुणे सुंदर पुणे
गणेश गोरख घाडगे
महाराष्ट्र अध्यक्ष माहिती अधिकार कायदा
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती
Susgoan la sr no. 138 /1, 138/3 la pan same situation ahe saheb , I’ll leagal plotting karun vikalay jaga , ani 7/12 la Shera ahe PACL company cha