(नांदेड प्रतिनिधी )
पती-पत्नी विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या करायचं प्रयत्न बिलोली तालुक्यातील दर्यापूर गावात घडलेली घटना. या घटनेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पती बचावला होता. पत्नी वियोगचा दुःख सहन न झाल्यामुळे पतीने सव्वा महिन्याच्या आत गळफास घेता आत्महत्या केली 23 मे रोजी सकाळी ही घटना घडली. गावाचे पोलीस पाटील असलेल्या शोभाताई नागनाथ शिवशेटे व त्यांच्या पती नागनाथ शिवशेटे या दोघेही दांपत्याने दिनांक 17 मे रोजी विषारी औषध प्रशासन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये शोभाताई यांच्या जागीच मृत्यू झाला व त्यांच्या पती वैद्यकीय उपचार दरम्यान बचावले होते. ते नुकत्याच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन गाव गाठले होते पण पत्नी गेलेला विरह त्यांना सहन होत नव्हता म्हणून 23 मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी बिलोली पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू नोंद करून पुढील तपास करीत आहे. त्यांच्या मागे दोन मुले व एक बहीण असा परिवार आहे. सव्वा महिन्यांमध्ये दोघांचे मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या लहान मुलांच्या डोक्यावरचा छत्र हरपला आहे या आकस्मात झालेल्या मृत्यूमुळे लोकांनी हळहळ व्यक्त करीत आहे.