प्रतिनिधी संतोष शितोळे
यवत :यवत पोलिसांनी गेले दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्टी चालकांवर कारवाई केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिले आहे. दिनांक 23 मे रोजी खामगाव येथील शेलारवाडी येथे तर दिनांक 24 रोजी नाथांची वाडी येथील हातभट्टी चालकावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की खामगाव गावाच्या हद्दीतील शेलारवाडी येथील वड्याच्या कडेला रात्री सुमारे 10 वाजता आरोपी सलमान धुला वय 40 राहणार खामगाव तालुका दौंड हा दोन हजार लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य तर 175 लिटर तयार गावठी दारू असं एकूण 95 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल सहित आढळून आला आहे. याबाबत पोलीस हवालदार रामदास जगताप यांनी फिर्यादी दिले आहे.
तर नाथाची वाडी गावाच्या हद्दीतील हाकेवाडी येथील हनुमंत आबा हाके यांच्या शेतात दिनांक 24 रोजी दुपारी एक वाजल्या सुमारास आरोपी अमरसिंग महानाजी यादव वय 32 सध्या राहणारा नाताची वाडी व संतोष जन्मले हे दोघेजण गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 3000 लिटर कच्चे रसायन व साहित्य 140 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू अशी एकूण एक लाख 27 हजार किंमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे. याबाबत पोलीस शिपाई मारुती बराटे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिली आहे यावरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत नाथाची वाडी येथील अमरसिंग महानाजी यादव संतोष जन्मले तर शेलारवाडी येथील गावठी हातभट्टी चालक सलमान धुला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही ठिकाणी दोन लाख 22 हजार रुपये चा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोर पोलीस नाईक कापरे हे करीत आहेत.