(संपादक बाबूराव क्षेत्रे पाटील )
पुणे :हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होते आहे. या प्रकरणात एकच कुटुंबातील 3 पिढ्या तुरुंगात आहेत. अल्पवयीन आरोपी बड्या बिल्डर्सच्या मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी कायदा नियमांचा धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झालंय. गुन्हा आपला डोक्यावर घ्यावी अशी ड्रायव्हरला धमकवण्यात आले होते आणि डांबून सुद्धा ठेवले होते.
त्याच कारणासाठी आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना सुद्धा अटक करण्यात आली. आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले होते. ब्लड सॅम्पल चेक केल्यानंतर कचरा डब्यामध्ये टाकण्यात आले होते. अल्पवयीन आरोपीने आपल्या भरधाव पोर्ष कारने दुचाकीला उडवलं या तरुण-तरुणीचा मृत्यू झाला.
पुणे अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पोलीस आयुक्ताची चर्चा केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोलीस आयुक्तांशी बोलले. पुणे या प्रकरणांमध्ये आरोपीची सखोल चौकशी करा या प्रकरणात सामील असलेल्या शेवटच्या आरोपी पर्यंत पोहोचण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट निर्देश दिले
प्रकरणात संघटित गुन्हेगारीचे कलम वाढवता येईल का यावरही वरिष्ठ पातळीवर विचार सुरू आहे. बिल्डर मंत्री आमदार खासदार कोणाचेही सहभाग असला तरी या प्रकरणात त्यांनाही आरोपी करा या प्रकरणाचे समाजामध्ये चांगलं संदेश जायला पाहिजे अशी पोलीस आयुक्तांना निर्देश देण्यात आले.