प्रतिनिधी संतोष शितोळे
लातूर. दिनांक 28 मे 61 पोलीस अध्यक्ष श्री चंद्रकांत रेड्डी यांना गोपनीय माहिती मिळाली की एमआयडीसी लातूर येथे बनावट गुटखा बनवण्याचे कारखाना चालू आहे.
सदर माहिती पोलीस अध्यक्ष सोमय्या मुंडे यांना कळवून त्यांच्या परवानगीने व अप्पर पोलीस अध्यक्ष देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे सहायक पोलिस अध्यक्ष श्री चंद्रकांत रेड्डी पोलीस उपनिरीक्षक चिरमाडे पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे हेडकॉन्स्टेबल विष्णू भंडारे व इतर पोलीस अंमलदाराचा टीम बनवून कोंबडे ऍग्रो एजन्सी या वेअर हाऊस वर छापा मारण्यात आला. या छापे मध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्चामाल सुपारी तंबाखू पावडर तसेच मिक्सर व सिलिंग करणाऱ्या मशीन तसेच पॅकिंगचे गोवा 1000. असे छायापिल कॅरीबॅग बनावट गुटखा एक ट्रक व एक पिकप व्हॅन असे एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल पंचा समक्ष जप्त करून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दिनांक 29 मे रोजी रजिस्टर नंबर362/2024 तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवडे यांनी 328 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लातूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत