( सहसंपादक सचिन खंडागळे)
बारामती. बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथील दिपाली जगन्नाथ कुतवळ या आरोपी ग्रामसेविकाने पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी 2017 मध्ये दहा हजार रुपये लाच घेतली होती. या लाच प्रकरणी दिपाली जगन्नाथ कुतवळ आरोपी ग्रामसेविका ला बारामती सत्र न्यायालयाने पाच वर्षाची कारवास आणि पंचवीस हजार रुपये द्रव्य दंडाचे शिक्षा ठोकवले. दिपाली याने पंतप्रधान घरकुल आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर करून देण्यासाठी दहा हजार रुपये चे लाच स्वीकारली. या प्रकरणी 28 फेब्रुवारी 2017 रोजी महाराष्ट्राच्या प्रतिबंधक अधिनियम कलम 713(1)ड सह 13(2) कलमा अन्वये पुणे विभागाकडून बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाच्या तपास पूर्ण करून आरोपीच्या विरोधात दोषारोप पत्र बारामती सत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते. आरोपीवर आरोप सिद्ध झाल्यामुळे ग्रामसेविकेला पाच वर्षाचे शिक्षा 25 हजार रुपयांचे द्रव्य दंडाची शिक्षा बारामती सत्र न्यायालयाने सोनवण्यात आली आहे. तसेच दंड न भरल्यास आणखीन सहा महिन्याचे कारवास भोगावे लागेल असे शिक्षा सोनवण्यात आली.