(उपसंपादक गणेश गोरख घाडगे)
सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक २२ मध्ये गाव मोजे वडगाव बद्रुक येथील हुशारे कॉम्प्लेक्स मधील फ्लॅटचे खरेदीखत हवेली क्रमांक २२ मध्ये करत असताना बनावट गुंठेवारी जोडून खरेदीखत करण्यात आले सह दुय्यम निबंधक कार्यालय यांनी पुणे महानगरपालिका यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांना पत्रद्वारे सांगण्यात आले हा आदेश वडगाव बुद्रुक येथील नसून तो आदेशाने दुसऱ्या व्यक्तीच्या नावे आहे. ज्या फ्लॅट धारकांनी फ्लॅट घेतले आहेत त्यांच्या सोबत फसवणूक झालेली आहे या फसवणुकी बाबत सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक २२ यांनी दिनांक ३०.५.२०२४ रोजी अलंकार पोलीस स्टेशन मध्ये समक्ष जाऊन कलम ४२०,४६५,४६८ व नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ खाली एफ आय आर दाखल करण्यात आले आहे पुढील तपास अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पंकज अर्जुन पवार करत आहे.
नागरिकांना विनंती आहे खरेदीखत करताना जे कागदपत्रे जोडले आहेत त्यांचे तपासणी करावी खरेदी खताला गडबड करू नये स्वतः व्यक्ती शहा कागदपत्रांची शहानिशा झाल्यानंतर खरेदी करावी होणाऱ्या फसवणुकीपासून आपली रक्षा करावी
आपण कोठे कागदपत्राची पडताळणी करू शकता
१. गुंठेवारी दाखला असेल तर आपण पुणे महानगरपालिके मध्ये अर्ज दाखल करून गुंठेवारी दाखला मिळवा म्हणून विनंती करू शकता.
२. अकृषिक जमीन असेल तर आपण तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज करून त्या कागदपत्राचे पडताळणी करू शकता.
३. ग्रामीण भागातील पीएमआरडीए कडे आपण कागदपत्रांचे पडताळणी करू शकता.