दि.१९/०५/२०२४ रोजी येरवडा पोलीस ठाणे येथे पोर्श कार अपघाताच्या अनुषंगाने गुन्हा रजि नंबर ३०६/२०२४ भादवि कलम ३०४,२०१,१२०(ब),२७९,३३८,३३७,४२७,४६६,४६७,४ भ्रष्टाचार अधिनियम सन १९८८ चेकलम ७, ७ (अ), १३ मोटार वाहन कायदा कलम १८४, १८५, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.
नमुद गुन्हयाचे तपासा दरम्यान अटक आरोपी यांनी संगनमताने कट रचुन विधी संघर्षित बालकास न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मदत होणेसाठी विधी संघर्षित बालकाच्या रक्ताचे नमुन्यांऐवजी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेवुन पुरावा नष्ट करुन सदरचा कट पुर्णत्वास नेला आहे. अटक आरोपींकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करता विशाल अगरवाल याने इसम नामे १) आशपाक बाशा मकानदार, वय ३६ वर्षे, रा. सर्व्हे नं ३१, धानोरी, पुणे २) अमर संतोष गायकवाड, वय २७ वर्षे, रा. सुभाष नगर, नवी खडकी, येरवडा, पुणे यांच्या मदतीने ससुन हॉस्पीटल मधील डॉ. अजय तावरे यांचे मध्यस्थीने अटक आरोपी डॉक्टर श्रीहरी हाळनोर व कर्मचारी अतुल घटकांबळे यांच्याशी आर्थिक देवाणघेवाण करुन गुन्हयातील विधीसंघर्षित बालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल केल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपींचा गुन्हे शाखे कडुन तांत्रिक विश्लेषणाव्दारे व बातमीदारा करवी शोध घेवुन त्यांना दाखल गुन्हयामध्ये दि.०४/०६/२०२४ रोजी अटक करण्यात आली असुन त्यांना मा. न्यायालयाने दिनांक १०/०६/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे.