(KP)
बारामती मधील माळेगावच्या गोपने वस्ती येथे बांधकामच्या ठिकाणी सोनोग्राफी मशीनद्वारे गर्भलिंग निदान सोनोग्राफी करण्याचा गोरख धंदा उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टर सहा एजंटला माळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून सोनोग्राफी मशीन जप्त केली आहे.
याबाबत बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर महेश जगताप यांनी फिर्यादी दिली आहे. गर्भलिंग निदान करणारा डॉक्टर मधुकर चंद्रकांत शिंदे फलटण जिल्हा सातारा आणि एजंट नितीन बाळासाहेब घुले तालुका बारामती जिल्हा पुणे असे दोघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले आहे. ग्रामीण विभागामध्ये चार चाकी गाडीमध्ये गर्भलिंग निदान होत असल्याचे तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागनाथ एम्पल्ले यांना मिळाली होती. त्यात तक्रारीचा पार्श्वभूमीवर यमपल्ले यांनी शिक्रापूर यावत दौंड इंदापूर बारामती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून सूचना देण्यात आले होते. त्यानुसार बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर जगताप यांनी माळेगाव पोलिसांना डॉक्टर मधुकर शिंदे यांच्या बाबत माहिती दिली होती म्हणून बारामती पोलिसांनी सापळा रचून डॉक्टर व एजंटला रंगेहात पकडले.
पुढील तपास बारामती पोलीस कडून केला जात आहे.