( संतोष शितोळे )
तालुका दौंड.
दौंड येथील नगरपालिकेचे हद्दीतील कत्तल खान्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात आलंहोता. ह्या कत्तलखाना बंद करण्यासाठी विश्व हिंदू परिषद चे कार्यकर्ते आवाज उठवला होता. श्रीनाथ ननवरे यांनी दौंड नगरपालिकेकडे पत्रव्यवहार केला होता.
त्यानंतर ननवरे वरती दौंड पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे आल्याचेही आखाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेले पत्रात म्हटलेलं आहे. कत्तलखान्यातून बाहेर पडणारा रक्त मिश्रित सांडपाणी हे भीमा नदीत जाण्याची शक्यता आहे असेही पत्रात म्हटले आहे. या नदी अष्टविनायकापैकी सिद्धटेक या गणपती मंदिराला लागून जाते. पुढे ही नदी नीरा नरसिंगपूर व पंढरपूरला चंद्रभागा म्हणून जाते. त्यामुळे रक्त मिश्रित पाण्याने तेथील हिंदू मंदिराचे पवित्र धोक्यात येण्याची शक्यता वारकरी संप्रदायाकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे भविष्यात याचा मोठा उद्रेक होऊ शकतो असेही पत्रात म्हटले आहे. त्याच्या अनुषंगाने हा दौंड येथील कत्तलखाना बंद करण्याची मागणी वारकऱ्यांनी केली होती. विश्व हिंदू परिषदेचे गणेश आखाडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत लेखी पत्र द्वारे हा कत्तलखाना बंद करण्याचे आग्रहाची मागणी केली होती. याबाबत आखाडे यांनी वारंवार पाठपुरावा सुरू ठेवला होता. या कत्तलखान्याचे विरोधात जन आंदोलन पण उभा केला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीच्या संदर्भात सह्याद्री अतिथी ग्रहांमध्ये बोलवलेला बैठकीत विभागीय आयुक्तांशी चर्चा करून दौंड येथील नगरपालिकेच्या हद्दीतील हा कत्तलखाना बंद करण्याचे आदेश केले आहेत. त्यामुळे हा दौंड नगरपालिकेच्या हद्दीतील कत्तलखाना आता बंद होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आदेश दिल्यामुळे हिंदू परिषद चे कार्यकर्ते व वारकरी संप्रदायातील मंडळीकडून मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. राज्यातील वारकरी मंडळी कडून मुख्यमंत्री यांचे आभारही मानण्यात येत आहे
आदेश न्यूज पुणे