( संतोष शितोळे ) दौंड
दौंड तालुक्यातील घरात विजेच्या शॉक बसून तीन जणांचा जागीच मृत्यू झाले ही घटना सोमवारी सकाळी 7:00 वाजता सुमारास घडली. त्यात सुरेंद्र भालेकर राधिका भालेकर व लहान मुलगा प्रसाद भालेकर यांचा समावेश आहे.बाहेर गावावरून उदरनिर्वाह करण्यासाठी हे कुटुंब या भागात आले आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून या घटनेची परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
आदेश न्यूज दौंड