सिंदखेड तालुक्यातील तामथरे गावातील एका गो शाळेतुन गोवंश विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी गो शाला संचालक आणि वाहन सांच्या वाहन चालक यांच्याविरुद्ध सोनगिरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात गो रक्षक विकास हरिश्चंद्र पाटील (22) यांनी पोलिसांना दिलेलं फिर्यादीत म्हटलेलं आहे. दिनांक 15 रोजी सकाळी 9.30वाजेच्या सुमारास विकास पाटील व त्यांच्या सोबत असलेल्या मिलिंद पाटील यांनी सरवड गावाच्या पुढे 2किलोमीटर अंतरावर नांदणे गावाकडे जाणार रोडवर जनावरांची तस्करी होत असलेल्या संशयावरून, वाहन एम एच 12vf3692. यांनी थांबवले व पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली. सोनगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची तपासणी केली असता जनावरांची निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. वाहन चालक समाधान संजय पाटील(26)रा डोंगरगाव तालुका शिंदखेडा यांच्याकडे चौकशी केली असता यांनी संबंधित जानवारे तामथरे येथील जितेंद्र राजपूत यांच्या गो शाळेतून त्यांच्या माणसाने मालकाने सांगितल्याप्रमाणे जाणवारे गाडीत भरून धुळे या ठिकाणचे मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी नेत असल्याचा समजून आले. पोलिसांनी वाहन व जानवर सहा अशी एकूण 1लाख 21 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणामुळे तामथरे येथील गोशाळेतून गोवांशाची कत्तलचे उद्देशाने परस्पर विक्री होत असल्याची आढळून आले. यावरून समाधान पाटील जितेंद्र राजपूत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.