(KP)
पुणे
पुणे शहर पोलीस आयुक्त अमीतेश कुमार हे सध्या विविध पोलीस ठाण्यांना भेट देऊन पाहणी करीत आहेत.
तीन महिन्यापासून एक मुलगा बेपत्ता आहे. त्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्याने बुधवारी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या भेट दिला. त्या वेळी आयुक्ताने भारती विद्यापीठ पोलीस परिसरात पायी फिरून पाहणी केले. काही नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या त्यानंतर ते सहकार नगर परिसरामध्ये आले. पद्मावती या ठिकाणी त्यांना पद पथावर महागडे आलिशान गाड्या उभ्या असल्याचे निदर्शनास आले. या गाड्यांवर फॉर सेल असे बोर्ड लावलेले होते. पदपथावर गाड्या उभ्या करून विक्रीचा बाजार भरलेले त्यांच्या निदर्शनास आलं. वादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता शिल्लक नव्हता. अवैद्य रीतीने पार्किंग करण्यात आल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांनी तात्काळ वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना बोलून घेतले. याबाबत जाब विचारला तुम्ही हद्दीत काही पाहता की नाही? असं जाब विचारला. अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. या गाड्या तुरंत जप्त करा आणि सहा महिन्यापर्यंत सोडू नका अशी सूचना केल्या. यासोबत शहरातील वाहतूक विभाग चे सर्व निरीक्षक,प्रभारी अधिकारी, तसेच सर्व पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना आपल्याला हद्दीत. पायी जास्त घालण्याच्या सूचना दिल्या. दररोज किमान पाच ते सहा किलोमीटर पायी गस्त घालण्यात यावी. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्या. नागरिकांना न्याय देण्याबाबत जागृत रहा. अशा सूचना त्यांनी केल्या. पोलीस रस्त्यावर दिसले तर नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल, तसेच गुन्हेगारांचे आणि गैरप्रकार यांचे प्रमाण कमी होईल, असे आयुक्त म्हणाले. अनेक ठिकाणी हॉटेल मालक वॅलेट पार्किंगच्या नावाखाली पदपथावर किंवा रस्त्याच्या कडेला ग्राहकांच्या गाड्या लावतात, मध्यवस्ती ते अनेक हॉटेल चालकांनी देखील या गल्लेबोळातील रस्त्यावर दु तर्फ गाड्या लावण्याच्या सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडलेले ग्राहक, पादचारी यांना अडचणींचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलिसांकडून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते. पोलीस चौकीमध्ये नागरी तक्रार किंवा समस्या घेऊन आल्यास त्यांची समस्या कशी सोडवता येईल, याचा विचार न करता पैसे कसे मिळतील याचा चौकीस्तारावर अधिक विचार केला जातो. त्यामुळे अनेकदा लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलीस चौकांचे समीकरण केले जाणे आवश्यक आहे. पोलीस चौकी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या देखील जबाबदाऱ्या निश्चित केल्या जाणार आहे अशी आयुक्त म्हणाले