आदेश न्यूज नेटवर्क
हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालय बाहेर अतिक्रमणामध्ये उचलून आणलेले साहित्य व तसेच कार्यालयाच्या बहार लागलेल्यावाहनामुळे अतिक्रमण वाढल्यामुळे हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालय समोर भंगार गोडवान चा परिस्थिती झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी वरून जात असताना अडथळा निर्माण होत आहे. तरी त्या ठिकाणची अडथळा ठरणारे सर्व वस्तू दुसरीकडे हलवण्यात यावे. जेणेकरून त्या ठिकाणी वरून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी व मुंडवा हडपसर क्षेत्रीय
कार्यालयामार्फत लवकर ते लवकर केली पाहिजे. ज्या ठिकाणी मुंडवा हडपसर क्षेत्रीय कार्यालय आहे त्या ठिकाणी जागा अपुरी पडते. अत्यंत कमी जागेमध्ये हे क्षत्रिय कार्यालय आहे. वाहन तळ सुद्धा अपुरी पडत आहे. कर्मचारी यांची वाहने अधिकारी यांची चार चाकी वाहनामुळे पार्किंग पूर्ण पूर्ण भरले जाते. त्यामुळे कामानिमित्त येणारे नागरिकांच्या गाड्या लावण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. त्यातच कारवाई करून जप्त केलेला हात गाडी,पत्रे, इतर सर्व साहित्य क्षेत्रीय कार्यालय परिसरात, वास्तव्यस्त पडलेले असतात. सर्वत्र अ स्वच्छता पसरलेले असून क्षत्रिय कार्यालयात उंदीर व घुशींचा सुळसुळाट वाढलेला आहे. अस्वच्छता झाल्यामुळे येणाऱ्या दुर्गंध वासामुळे नागरिकांना ना हाक त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छ पुणे सुंदर पुणे म्हणणारे क्षेत्रीय कार्यालय मध्येच अस्वच्छता आहे. आदेश न्यूज नेटवर्क तर्फे हडपसर व मुंडवा क्षेत्रीय अधिकार्यांना विनंती आहे की लवकर ते लवकर या ठिकाणी स्वच्छता मोहीम आखावी.