आदेश न्यूज नेटवर्क
पुणे शहराला अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी बेकायदेशीर चालू असलेल्या दोन नंबरचे धंदा बंद करा….
पुणे शहर अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी व दोन नंबर धंद्यांना हद्दपार करण्यासाठी तुरंत व तातडीने कारवाई करा. अमली पदार्थांची संबंधित असलेल्या नाधिकृत बांधकामावर बुलडोजर फिरवा. अशी सक्त आदेश श्री मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांना दिला आहे. पुणे शहरामध्ये अमली पदार्थ विक्री होत असलेल्या निदर्शनास आले नंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहे. व अमली पदार्थ विक्रेत्यावर नव्याने कठोर कारवाई सुरू करावी. यासंदर्भात अनाधिकृत बांधकाम वर बुलडोजर फिरून कठोर कारवाई करा. पुणे शहराला अमली पदार्थ मुक्त शहर करण्याची आवश्यकता आहे. आवश्यक असलेले सर्व उपाय योजावेत असे मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले.