प्रतिनिधी कात्रज
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५००/२०२४ भादंवि कलम ३०७,३४, महा पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३) सह १३५. भारतीय हत्यार कायदा कलम ४. (२५).५ (२७) अन्वये दाखल गुन्हयातील आरोपी १. निलेश रविंद्र नागटिळक, वय २१ वर्षे, रा. विघ्नहर्ता अपार्टमेंन्ट, मांगडेवाडी, कात्रज, पुणे २. अथर्व संतोष सुतार, वय १९ वर्षे, रा. सई रेसीडन्सी, फ्लॅट नंवर ४०८, मांगडेवाडी, कात्रज, पुणे ३. सुशिल रमेश शिरसाठ, वय २० वर्षे, रा. शिवतीर्थ अपार्टमेन्ट, फ्लॅट नंबर ०२, मांगडेवाडी, कात्रज, पुणे ४. अभिजीत ऊर्फ दगडु दिलीप गेजगे, वय २० वर्षे, रा. भैरवनाथ मंदीराजवळ, मांगडेवाडी, कात्रज, पुणे यांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार है शोध घेत असताना पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी याना त्याचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली होती.
नमुद आरोपी हे गुन्हा करुन झाल्यानंतर ते पुणे शहरातुन सोलापुर व धाराशीव जिल्हयात फिरत आहेत अशी बातमी मिळाल्याने सपोनि समीर कदम व स्टाफ यांनी सोलापुर, धाराशीव जिल्हयात जावुन सदर आरोपीतांचा शोध घेत असताना त्या दरम्यान पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांना नमुद आरोपी हे आष्टी, जालना जिल्हयात गेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली, त्या माहीती वरुन लागलीच सपोनि समीर कदम व स्टाफ यांनी आष्टी, जालना जिल्हयात जावुन नमुद आरोपीताचा शोध घेतला असता ते मिळुन आल्याने त्यांना नमुद गुन्हयात्त अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त
स्वारगेट विभाग, श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाः पोलीस निरीक्षक समीर कदम, विश्वास भाबड, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, निलेश खैरमोडे, विक्रम सावत, सागर कोडे यांच्या पथकाने केली आहे.