आदेश न्यूज नेटवर्क
दिनांक 28 /6/24 रोजी संध्याकाळी नऊ वाजता
बोपोडी ह्या महामार्गावर नवी कोरी कार दोन गाड्यांच्या मध्ये अडकून जागेवरच चक्काचूर झाला आहे. त्या गाडीमध्ये एअर बॅग असल्यामुळे ड्रायव्हर जागीच बचावला आहे. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आली आहे. सगळ्यात पुढे मोठा लोडर ट्रक होती. त्या गाडीच्या पाठीमागे नवी कोरी कार होती. कारचे पाठीमागे आणखीन एक ट्रक होता. अचानक पुढच्या लोडर गाडीने ब्रेक दाबल्यामुळे, नवी कारचे ड्रायव्हर ब्रेक मारायचा प्रयत्न केला तरी तो पुढच्या ट्रकला धडक दिला. त्यानंतर भरदाव वेगाने येणारे दुसरं एक ट्रक मागून येऊन धडक दिल्यामुळे नवीन कार दोन्ही ट्रक मध्ये अडकून जागेवरच चक्काचूर झाली स्थानिक लोकांनी कसेबसे ड्रायव्हरला ओढून काढून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले.