आदेश न्यूज नेटवर्क
पुणे जिल्हा
दरवर्षी चैत्र षष्ठीला ग्रामदैवत रोकडोबानाथ देवाची यात्रा भरते. यावेळी ग्रामस्थ स्वतःहून वर्गणी देतात. देवाचे अभिषेक. पूजा देवाच्या छबिना लोकनाट्य तमाशा विविध कार्यक्रमामुळे यात्रेची रंगत वाढते. कामामध्ये खोपोडी सोसायटी असून या सोसायटी वरती गावाचे अर्थकारण अवलंबून असते. या गावाला खोपडी या नाव पडण्यास एक पुरातन कहानी या ठिकाणी आपण सर्वजणांना आठवण करून द्यावी असं वाटते.
गावाभिवती काटेरी झुडपे होती गावामध्ये एक साधू आले. त्या साधूंचे अनेक शिष्य तयार झाले. त्या साधु महाराजांच्या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविक यायचे. त्या साधू महाराजांनी. जीवन समाधी घेतले. महाराजांच्या खोपा काढून गाव बसल्याने त्या गावाला खोपडी असे नाव पडले. असे जाणकार सांगतात. पूर्वी खोपोडी पारगाव च्या वाडी म्हणून प्रसिद्ध होती. ग्रुप ग्रामपंचायत असल्याने वेगवेगळे कामानिमित्त. या ग्रामस्थांना परगावला जावे लागत होते. परंतु 1992 ला खोपोडी स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून मंजूर झाली. माजी सरपंच बाळासाहेब शितोळे यांच्या प्रयत्नामुळे आर आर पाटील यांच्या हस्ते तंटामुक्त पुरस्कार,हागणदारी मुक्त पुरस्कार. मिळाले आहेत. याच काळामध्ये श्री हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. छोटे नागोबाचे पण मंदिर आहे. येथे दरवर्षी नागपंचमीला महिला आवर्जून येतात आणि पूजा करतात.