आदेश न्यूज नेटवर्क
18 वयाच्या आतील बालकांवर मोठ्या स्वरूपाची शस्त्रक्रिया आता केंद्र व राज्य सरकार तर्फे मोफत केली जाणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम ( आर बी एस के ) अंतर्गत करण्यात आलेला आहे. पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल व पिंपरी चिंचवड या ठिकाणचे आदित्य बिर्ला हॉस्पिटल, येथे बालकांच्या मोठ्या प्रमाणाचे शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहेत. याबाबत करार राज्य कुटुंब कल्याण या कार्यालयाने नुकताच हॉस्पिटल सोबत करार केला आहे. यामुळे बालकांचा हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये खर्च थांबवण्यात आले आहे. या करारानुसार 18 वयोगटातील बालकांसाठी काशीबाई नवले हॉस्पिटल या ठिकाणी हृदयरोग अस्ति रोग शास्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, मेंदूची शस्त्रक्रिया, दातांची शल्य चिकित्सा, कानाचे शस्त्रक्रिया, आणि डोळ्यांचे उपचार, मोफत होणार आहेत. आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी दुभंगलेले हृदय शैल्यचिकित्सा मेंदूची शल्य चिकित्सा, दातांची शल्यचिकित्सा, डोळ्यांचे उपचार होणार आहेत. हे उपचार झाल्यानंतर आर बी एस के ने ठरलेल्या दरानुसार देण्यात येणार आहेत. याबाबत करार 23 मे रोजी कुटुंब कल्याण कार्यालय मध्ये अतिरेक संचालक डॉक्टर रघुनाथ भोये यांनी केला आहे. पुण्यासह नाशिक वर्धा आणि मुंबईतही हॉस्पिटल देण्यात आले आहेत.