- आदेश न्यूज नेटवर्क
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. विठ्ठल माझ्या बळीराजाला सुखी ठेव. कष्टकरांच्या सामान्यांच्या जीवनात समृद्धी दे. प्रत्येक दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ परिवहन मंत्रालय केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अध्यक्ष शिरीष देशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80लाखाच्या निधी मंजूर केलेलं आहे. या अंतर्गत सुरू असलेले सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिरात दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धती हे तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीने तयार केलेले 103 कोटीचा आराखडाला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंदिर समितीच्या एमटीडीसी सोबत असलेल्या करार पुढेही वाढविण्यात येईल, तसेच भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे मंदिर समितीचे कर्मचाऱ्यांचे अडचणी सकारात्मक दृष्टीने सोडवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले