ओम नमो आदेश.
आदेश न्यूज नेटवर्क पुणे
खताच्या काळाबाजार धाराशिव येथील कृषी विभागाने उघड केला असून 30 टन डीएपी जप्त करून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात येथील एका कंपनीच्या परवाना निलंबित असताना देखील त्यांनी खत निर्मिती केले, मात्र कृषी विभागच्या सतर्कने हा काळाबाजार उघड झाला आहे. जिल्हा कृषी अध्यक्ष रवींद्र माने यांच्या पथकाने रंगेहात 8 लाखांच्या खत साठा वाहतूक होत असताना पडला असून आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई तुळजापूर लातूर बायपास येथे करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांच्या सतर्क मुळे पाटलाग करून ट्रक पकडण्यात आला, नंतर मुळे यांनी दिलेले तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक खेडेकर यांच्या आदेशानुसार भालेराव यांनी तपास करीत आहे.