सामान्य जनतेचे मनामधलं प्रश्न उपस्थित होत आहे कारण रात्रभर धिंगाणा घालणारे कॉलेजच्या तरुण-तरुणी यांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही त्या ठिकाणी नसते रातभर बिअर बार वाईन शॉप मोठे मोठे हॉटेल्स पान टपऱ्या भुर्जी पाव चे गाड्या चहाचे टपऱ्या या ठिकाणी सर्वच चालू असतात पण त्याच्यावर कोणाचेही लक्ष नाही .
लक्ष नाही म्हणणे चुकीचे ठरेल पोलीस प्रशासन मेन रस्त्यावर रात्रभर गस्त घालत असतात पण त्रिमूर्ती चौकाच्या आतल्या बाजू का येत नसावे किंवा त्यांचाच आशीर्वाद मुळे हा सर्व प्रकार चालू नसेल का? अशी संघर्ष सेनेचे अध्यक्ष संतोष आप्पा साठे यांचा प्रश्न आहे
संतोष आप्पा साठे याच्या अगोदर पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय धनकवडी या ठिकाणी टेरेसवर जाऊन आंदोलन केलेला आहेत व तसेच कचरा डेपोवर चालणारा डिझेल विक्रीवर सुद्धा त्यांनी आंदोलन उभा केले होते आज त्यांचा प्रश्न आहे की रात्रभर कोणाच्या आशीर्वादाने हे सर्व दुकाने चालू आहेत त्यांचा मनन अगदी बरोबर आहे कारण संध्याकाळच्या नंतर त्या रस्त्यावरून कॉलेजच्या मुला मुली सोडले नंतर दुसरं कोणीही त्या ठिकाणी नसतो आणि त्या ठिकाणी वरून कोणीही गाड्या आणायचा धाडस करत नाही कारण ट्राफिकच इतका जाम असतो त्यामुळे तिकडे जाणं म्हणजे दोन तास उशिराने गाडी बाहेर निघेल म्हणून स्थानिक लोकांनी त्या रस्त्यावरून कोणीच येत नाही दुसरा पर्याय रस्ता शोधून आपल्या आपल्या घरी निघून जात असतात त्या ठिकाणचे रहिवाशांना खूप याचा मनस्ताप होत आहे पण सांगणार तरी कोणाला हे सामान्य जनतेचा प्रश्न आहे शासन प्रशासन त्वरित जाग व्हावे महानगरपालिकेच्या अधिकारी या ठिकाणी लक्ष घालावे पोलीस प्रशासन या ठिकाणी लक्ष घालावे त्याच वेळेला काहीतरी प्रश्न मार्गी लागेल.