आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी १३०० कोटींच्या विकास आराखड्यास मंजूरी देण्यात आली.या माध्यमातून पुण्याच्या ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
या बैठकिमध्ये जिल्ह्याच्या विविध विकास कामे व समस्यांवर चर्चा झाली.बैठकीस जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार,जिल्हा नियोजन समिती सदस्य,जिल्हाधिकारी,जिल्हा प्रशासनातील सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.