आदेश न्यूज नेटवर्क
पुणे लोणीकंद.
बनावट कागदपत्रे दाखवून नोकरीच तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या लोणीकंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन चंद्रकांत चोरबुले वय 36 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 32 वर्षाच्या वयाच्या मुलाने तक्रार दाखल केली आहे. याबाबत मिळालेला माहिती अनुसार बनावट कागदपत्र द्वारे नोकरी मिळवण्याबद्दल तक्रार करणाऱ्याच्या अर्ज लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल होता. त्याच्या तपास वाघोली पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन चोरबुले यांच्याकडे होता. या तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी, व यापुढे तक्रारदार यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी चेतन चोरमबुले यांनी 5 लाख रुपयांचा लाच मागितले. अगोदरच या तक्रार अर्जामुळे नोकरी गेली असताना आणखी पाच लाख रुपयांचे लाच मागित असल्याने ,त्यांनी लाच लुजपत प्रतिबंधक विभागाने24 जुलै रोजी पडताळणी केली, चोरबुले यांनी तडजोडीची रक्कम म्हणून 1 लाख रुपयांची मागणी केली. परंतु त्यानंतर सापळा व कारवाई होऊ शकली नाही. मात्र लाचेची मागणी करण्याची निष्पन्न झाल्याचे अखेर बुधवारी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस अधिकारी माधुरी भोसले पुढील तपास करीत आहेत.