24/08/2024
आदेश न्यूज नेटवर्क
भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने वेतनवाढ व हरियाना सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार मिळावा या व अन्य प्रमुख मागण्यासाठी आज शनिवार दि.24 ऑगस्ट रोजी राज्यभरातून सुमारे 4000 वीज कंत्राटी कामगार एकत्र येऊन रेशीमबाग मैदान पासून ते ऊर्जामंत्री मा ना देवेंद्रजी फडणवीस यांच्या निवासस्थाना पर्यंत पायी मोर्चा काढला, हा मोर्चा संविधान चौक येथे अडवण्यात आला.
26 कामगार प्रतिनिधी यांनी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात व सचिन मेंगाळे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जामंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मा. सुनील मित्रा यांना निवेदन दिले.
राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संघटने सोबत सकारात्मक चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढावा व जो पर्यंत ऊर्जामंत्री भेटून ठोस तोडगा काढत नाही तो पर्यंत कामगार घरी जाणार नाही या कामगारांनी संविधान चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. निलेश खरात प्रदेशाध्यक्ष. सुमित कांबळे पुणे जिल्हा अध्यक्ष