पाच वर्षापासून 18 गुन्ह्यातील आरोपीस मंगळवेढा पोलिसांनी केला अटक.
अवताडे शुगर फॅक्टरी मंगळवेढा येथील सुमारे नऊ लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त.
13 जुलै रोजी रात्री 12.30 वाजता दरम्यान आवताडे शुगर फॅक्टरी बालाजी नगर नंदुर तालुका मंगळवेढा येथील साखर कारखान्याच्या आवारातील डब्ल्यूटीपी प्लांट जवळील स्टोर रूमचे कोणीतरी अज्ञात चोरटाने खिडकीचे लोखंडे गज तोडून तसेच शटर उचकटून आत प्रवेश करून अंदाजे पाच लाख 94 हजार रुपये ब्रास मटेरियल अंदाजे सहाशे किलो वजनाचे साहित्य फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेला म्हणून चंद्रकांत नारायण राठोड व 48 यांनी सुरक्षा अधिकारी फिर्यादी दिल्याने मंगळवेढा पोलीस ठाणे गुन्हा नंबर 512/2024 बी एम एस 2023 चे कलम 305 .331.3(4)3(5) प्रमाणे 13 जुलै 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील गुन्ह्यातील2 आरोपींना मंगळवेढा पोलिसांनी अटक केला आहे. त्यांना दोन दिवसाचे पोलीस कोठडी मिळाली असून मंगळवेढा पोलिसांनी पुढील तपास करीत आहेत