( संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील )
पुणे सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि चार राऊंड असा एकूण एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी दिनांक 20 सायंकाळी सव्वा सहा वाजता डीपी रोड येथील बेगन व्हिला फार्म मोकळ्या मैदानात केली. रोहन उर्फ दुध्या सुवास चव्हाण वय 27 राहणारा दारूवाला पूल सोमवार पेठ असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. युनिट तीन चे पोलीस अधिकारी व कर्मचारी अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दुध्या चव्हाण बोगन हिला फार्मच्या मोकळ्या मैदानातील झाडाखाली थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे देशी बनवण्याचे दोन पेस्टल आणि चार राऊंड एक मोपेड असा एकूण एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी घरपोडी पिस्टल बाळगणे यासारख्या गंभीर गुन्हे दाखल आहेत. भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता. पुढील तपासणी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत