(जळगाव प्रतिनिधी)
साविस्तर :जळगाव जिल्ह्यातून एक लाच खोरीचा मोठी बातमी समोर येत आहे. गौण खनिजाचे रॉयल्टी भरण्यासाठी 25000 रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तालुका पारोळा तलाठी वर्षा रमेश काकुस्ते त्यांना लाचलूच पत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी आज ताब्यात घेतले आहे.
पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे येथील तक्रारदार यांच्या वीट भट्टी आहे. वीट उत्पादनासाठी मातीची आवश्यकता होती. त्यामुळे मातीची वाहतूक करण्याकरता त्यांनी तलाठी वर्ष काकुस्ते यांची भेट घेऊन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरता तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये जमा करून घेतले त्यानंतर तक्रारदारने गौणखनिज परवानाची चौकशी करण्यासाठी तलाठी वर्ष काकुस्ते यांची 12 डिसेंबर 2023 रोजी भेट घेतली .
यावेळी त्यांनी तक्रारदाकडे यापूर्वी दिलेल्या पैशाची पावती न देता त्या व्यतिरिक्त 25 हजार रुपयांची मागणी केली होती. सदर तक्रार ची 13 डिसेंबरला पडताळणी केली. दरम्यान तलाठी वर्षा काकुस्ते यांनी तलाठी कार्यालय शिवरे येथे त्याच दिवशी पुन्हा पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडे पंचवीस हजार रुपयाची लाचेची मागणी करत सदर रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले सत्यता आढळून आल्याने त्यांचे विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला तलाठी वर्षा काकूंस्ते यांना ताब्यात घेतला आहे.