(उपसंपादक गणेश घाडगे)
केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे हरवलेल्या/चोरीस गेलेल्या मोबाईलची माहीती मिळवणे संदर्भात (Central Equipment Identiy Register CEIR) ही प्रणाली सुरू करण्यात आली होती.
केंद्र शासनाच्या CEIR प्रणालीचा वापर करुन डेक्कन पोलीस ठाणे कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक, विपीन हसबनीस महिला पोलीस अंमलदार उमा पालवे, सरोजा देवर, सुप्रिया सोनवणे व पोलीस अमंलदार रोहित पाथरुट यांचे टिमने केला. CEIR प्रणालीवर वेगवेगळ्या राज्यात तसेच महाराष्ट्रातील जिल्हयामध्ये हरवलेले मोबाईल चालु असल्याबाबत माहीती दिसत होती. सायबर टिमने हरवलेल्या मोबाईलची माहीती संकलीत करून त्यानंतर मोबाईल फोन वापरकरांशी संपर्क साधुन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एका महिन्यामध्ये नागरिकांचे किं. रू २,१०,०००/- चे १३ मोबाईल हस्तगत केले.
आपला मोबाईल हरवला असेल अथवा चोरीला गेला असेल दिलेल्या लिंक वरती जाऊन आपली तक्रार नोंदवा तुमचा मोबाईल सापडल्यास पोलीस अधिकारी आपल्याशी संपर्क साधतील