मुख्य संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील
हिट अँड रन केस प्रकरणी रोज नवीन नवीन बातम्या समोर येत आहे. सध्या या प्रकारात ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना पुणे गुन्हे शाखेचा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. डॉक्टरना अटक केल्यानंतर या प्रकरण वरून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गट उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांवर हप्ते घेतल्याचे गंभीर आरोप केले.
पण या आरोपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आमदार धंगेकर यांनी केलेला आरोपावर आपले मत व्यक्त केले आहे, प्रसार माध्यमातून म्हणाले की एका वृत्तवाहिनीला पाहिले की एका कोणत्यातरी पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतले असे सांगितले. पण पाच लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करणारे राजकीय नेत्याने एका पोलीस अधिकाऱ्यांच्या आरोप करण्यात करत असेल तर त्याचा पुरावा दिला पाहिजे. नुसता आरोप केला तर त्याचा पुरावा दिला पाहिजे नुसता आरोप करण्यात काही अर्थ नाही. पुरावे दिले तर त्या प्रकरणाची चौकशी करण्याचे काम राज्य सरकार करेल. अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार धंगेकर यांना आव्हान केले आहे.