( संपादक बाबुराव क्षेत्रे पाटील )
अशाच आता चार वर्षाचा चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादाय घटना उघडकीस आली आहे. आरोपीने चार वर्षाचा मुलीला आडोशाला घेऊन जात तिच्यासोबत असभ्य वर्तन करताना पीडित मुलीच्या आईने त्याला पकडले आहे. हा प्रकार रविवारी 26 मे रोजी सायंकाळी सात वाजता सुमारास वडगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी नरधामावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी एकच परिसरात राहण्यास आहेत. रविवारी सायंकाळी सात वाजण्या सुमारास आरोपीने फिर्यादी आज चार वर्षाचा मुलीला घराच्या जवळ हाड बाजूला घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीने मुली सोबत अश्लील वर्तन केले यावेळी पीडित मुलीच्या आईने हा सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर मुलीचे आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केले. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करत आहेत.