पुणे शिंदेवाडीच्या परिसरातील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह वळविल्याच्या किंवा अडविल्याच्या तक्रारींची जिल्हा प्रशासनाकडून 2014 दखल घेण्यात आली होती.सन २०१४ शिंदेवाडीमध्ये अचानक आलेल्या पुरामध्ये (फ्लॅश फ्लड) मायलेकींचा बळी गेला . या दुर्घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती.
भोरचे प्रांत अधिकारी संजय आसवले यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती व त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली व कारवाई केली.
या घटनेला दहा वर्षे पूर्ण झाले आहेत वास्तविक स्थिती पाहता घटनास्थळी जसे होते तसेच आहे . पाऊस आल्यानंतर डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी ओढा ने पुढे जाते परंतु काही लोकांनी तो ओढा बुजवला आहे व त्यावर ते पत्राचे शेड मारून गोडाऊनस तयार केले आहेत यामुळे पाऊस आल्यानंतर डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी हे रोड वरती येत आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र मुख्य कार्याध्यक्ष गणेश घाडगे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक ०३.०५.२०२४ रोजी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे व त्यासोबत वस्तू स्थितीचे पुरावे देखील जोडण्यात आले आहेत. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहिल का एखाद्याचा जीव गेल्यानंतर पुन्हा येत नाही पण आपण जबाबदार नागरिक म्हणून प्रशासनाला जागे करू शकतो व होणाऱ्या दुर्घटना कशा थांबवता येतील यावरती आपले मत प्रशासनाला सांगू शकतो . जिल्हाधिकारी यावर काय करतात हे महत्त्वाचे आहे कारण पावसाळा हा अगदी जवळ आला आहे यावर योग्य ती कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ची मागणी आहे.