( उप संपादक गणेश गोरख घाडगे)
पुणे.
दिनांक 30/ 5 /2019 रोजी
फरसखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी सौरभ कट्टीमनी यास मारहान केलेले आरोपी नामे येस जावळे सुरज पंडित प्रतीक शिंदे गणेश अशी चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विषय असा आहे की सौरभ कटीमनी हा राहणार आंबेगाव याच्या सर्व मित्र परिचयाचे होते 30 तारीख च्या रात्री 1:30 वाजता सौरभ ला फोन आला होता भरतरी मठ मंगळवार पेठ या ठिकाणी भजन कार्यक्रम आहे तू लवकर ये अशी त्याच्या मित्राचा फोन आला होता त्यावेळी सौरभ त्या ठिकाणी गेला त्याचीच वाट पहात चार मित्र बाहेर थांबले होते. सौरभ जवळ येतात त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याच्याबरोबर बोलत बाहेर दुसरीकडेच घेऊन गेले त्यावेळेला यश म्हणाला की मी आत्ताच मोका मधून बाहेर आलो आहे तू आमच्या पोरांना किंमत देत नाही पण तू आमच्या पोरांना कुठल्याही कामाला मदत करत नाही तुला खूप माज आला आहे का? तू खूप मोठा झाला आहेस का?अशी दमदाटी करत तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत सुरज पंडित यांनी सौरभच्या डोळ्यावर स्प्रे मारले त्यामुळे सौरभचे डोळे दिसेनासे झाले.
आणि तो खाली कोसळला यावेळी चौघांनी मिळून त्याला लाथा बुक्क्यांनी बेल्टने खूप महाराणी करून रक्त बोबाळ करून टाकले. ते सर्व याच ठिकाणी न थांबता त्याला कसेबसे गाडीवर टाकून महंमदवाडी येथील स्मशानभूमीचा येथील मोकळे मैदानावर नेले तिथे पण त्या सर्वजण लाथा बुक्क्याने हाताने बेल्टने असे नाना रीतीने मारहाण करून त्याला खूप रक्तस्राव करून टाकले व तसेच खिशामध्ये असलेले पाच ते सहा हजार रुपये काढून घेतले त्यावेळी कोणीतरी त्यांना फोन करून सांगितलं ह्या पोराला कुठल्यातरी हॉस्पिटल समोर सोडून द्या कोणीतरी एकाने ओबेरा बुक करून कमला नेहरू हॉस्पिटल पर्यंत सोडण्यास सांगितले पुढील तपास फारसखान पोलीस करीत आहे.