अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती
लातुर येथील 5 नंबर चौकात ट्राफिक पोलीस बालाजी हारंगुळे यांनी एका व्यक्तीकडून 100 रुपयाची लाच घेण्यास जवळच्या एका व्यक्तीला सांगीतले,हे सर्व लातुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अदित्य कासले यांनी पाहीले आणी झालेल्या प्रकाराचा व्हीडिओ तयार केला,हे बालाजी हारंगुळे नावाच्या ट्राफिक पोलीसांनी बघीतले आणी तो आदीत्य कासले यांना तु व्हीडिओ डिलीट कर नसता तुझ्यावर 353 करतो, तुला पोलीस खाक्या दाखवितो आशी धमकी दिली.आदीत्य कासले नी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांना फोन करून हा पोलीस मला धमकी देतो आपण ताबडतोब या
अवघ्या 10 मिनीटात राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा हे 5 नंबर चौकात पोंहचले आणी त्यांनी ट्राफिक पोलीस बालाजी हारूगुंळे यांना जाब विचारला, आणी 5 नंबर चौकातच ठिय्या आंदोलन केले,पोलीस बालाजी हारंगुळे घाबरुन गेला, तो पळुन जाऊ लागला,बाबानी त्याला जाऊ दिले नाही, बर्याच वेळ ठिय्या आंदोलन केले.
या वेळेस बोलतांना बाबा म्हणाले लातुर चे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय्या मुंडे यांनी MIDC परिसरात अंदाजे 3 कोटी रुपयाचा गुटखा एका कारखान्यातुन पकडला, आरोपीस जेरबंद केले, एवढे मोठे काम त्यांनी केले पण हे ट्राफिक पोलीस वाले मात्र पोलीस खात्याचे नाव बदनाम करीत आहेत,बाबांनी या वेळेस सोमय्या मुंडे अधिक्षक यांचे अभिनंदन केले
ट्राफिक पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक श्री कदम आणी त्यांचा सर्व स्टाफ या वेळी आला, आणी ते बाबा ना म्हणाले आपली तक्रार धा मी संबंधित पोलीस बालाजी हांरगुळे यांना बडतर्फ करतो,हा झटका अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समितीचा आहे,या लातुर जिल्हाध्यक्ष युवक तुषार रेड्डी लखनगीरे यांनी मोलाचे काम केले प्रदेश अध्यक्ष उधोग श्रावण रावणकुळे, सरपंच ओम माने या वेळेस उपस्थित होते