( नांदेड प्रतिनिधी )
जल जीवन मिशन ग्रामीण भागात सुरू असलेल्या बोगस व निकृष्ट कामाचे निरीक्षण करून दोशी कंत्राटदार वर कारवाई करण्यासंदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे वतीने जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करना वाल यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अर्जाच्या दखल घेत 15 कंत्राटदारांना काळे यादीमध्ये टाकले.
387 कंत्राटदारांन दररोजचे 500 रुपये दंड आकारण्यात आला. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नांदेड च्या वतीने जल जीवन मिशनचे अनेक ठिकाणी होत असलेल्या भ्रष्टाचार चे विरुद्ध बुलंद आवाज पुकरला त्यामुळे अशा बोगस कंत्राटदार वर कारवाई करण्यात आले तसेच दंड ही करण्यात आले सलाम आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नांदेड जिल्हा कमिटीचा जिल्हाध्यक्ष गजानन पाटील. तालुका अध्यक्ष बाबुराव क्षीरसागर. व शिवकुमार काळे यांनी कार्यकारी अध्यक्षांचा भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली व तसेच निवेदन सुद्धा देण्यात आले त्यामुळे कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून दोषी कंत्राटदार 387 लोकांना दररोजचे पाचशे रुपये दंड आकारण्यात आले.