( प्रतिनिधी पुणे)
मुळव्याध बरं करतो म्हणून बोगस दवाखाना थाटलेला भोंदू गिरी डॉक्टर उज्वल कुमार सुनील बक्षी राहणार पंचशील मित्र मंडळ जवळ मावळेअळी कर्वेनगर पुणे 52 वारजे माळवाडी अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध पुणे महानगरपालिकेचे डॉक्टर आसाराम शामराव काकडे क्षेत्रीय कार्यालया वैद्यकीय अधिकारी पुणे महानगरपालिका राहणार सत्यम श्रेय सोसायटी बावधन पुणे यांनी दिलेला तक्रार नुसार वारजे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकारी पुढील कारवाई करीत आहेत.
बोगस डॉक्टर उज्वल कुमार यांच्याकडे कोणतेही वैद्यकीय पात्रता नसताना मुळव्याध केंद्र चालवत आहेत या स्वरूपाची तक्रार दिनांक 6/3/ 2024 रोजी दूरध्वनी वरून प्राप्त झाली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने डॉक्टर सूर्यकांत देवकर सहायक आरोग्य अधिकारी तथा सदस्य बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समिती पुणे महानगरपालिका यांनी दिनांक12/3/2024 रोजी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका यांना सदर तक्रारीबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत लेखी पत्र दिले. त्या अनुषंगाने डॉक्टर अरुण तारडे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय सदर मुळव्याध उपचार केंद्र पंचशील मित्र मंडळ जवळ मावळे आळी कर्वेनगर पुणे या ठिकाणी दिनांक 18/3/2024 रोजी भेट दिली असता सदरील समोरील बोर्डावर मुळव्याध उपचार केंद्र वैद्य उज्वल कुमार साईडच्या बोर्डावर मुळव्याध उपचार केंद्र डॉक्टर उज्वल कुमार असे बोर्ड लावून वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे आढळून आले एका गाळ्यात वेटिंग रूम ओपीडी आणि टेबल साठी असे तीन पार्टिशन केलेला आढळून आलेलं आहे. ओपीडी मध्ये बक्षी उज्वल कुमार सुनील या नावाचे दोन सर्टिफिकेट पूजा बिंदू कुमार या नावे दोन सर्टिफिकेट दर्शनी भागामध्ये लावलेले आढळून आले बायो मेडिकल वेस्टीज ही विल्हेवाट लावण्यासाठी वास्को चे रजिस्ट्रेशन घेतलेले आढळून आलेले नाही. सदर ठिकाणी कुठलेही ओरिजिनल सर्टिफिकेट घेतलेले आढळून आले नाही. तसेच एका अर्धवट लिहिलेले जसे की पेशंट नाव न लिहिणे शिक्का न मारणे तसेच त्या ठिकाणी आढळून आलेले इंजेक्शन टीटी इंजेक्शन झायलोकीन शिरेनजेस यावरून या व्यक्ती उज्वल कुमार बक्षी एलोपॅथिकची प्रॅक्टिस करत असल्याचे आढळून आलेले आहे. तसेच जैव वैद्यकीय कचऱ्याच्या शस्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण केले जात नाही व विलेवाटही लावली जात नसल्याचे आढळून आलेले आहे. अरुण तारडे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांनी वरील प्रमाणे अहवाल मा आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका यांना 20/3/2024 रोजी सादर केला आहे. सदर उज्वल बक्षी या बोगस डॉक्टर विरुद्ध कारवाई करणे बाबत लेखी कळवले आहे. त्या अनुषंगाने 16/5/2024 रोजीच्या पत्राने क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय यांना नजीकच्या पोलीस ठाणे मध्ये तक्रार दाखल करणे बाबत आदेश दिले आहेत. उज्वल कुमार बक्षी या इसमाने त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय पात्रता नसताना आर्थिक फायदा करिता मुळव्याध केंद्र चालवून पेशंटची पासून केली म्हणून आज रोजी मी समक्ष हजर राहून महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशन अॅक्ट 1961 मधील कलम 33 (1)36(1) तसेच भारतीय दंडविधी कलम 419.420 अन्वये फिर्यादी देत आहे वारजे माळवाडी पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केलेला आहे.