भारती विदयापीठ पोलीस स्टेशन
(कात्रज प्रतिनिधी)
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे यांना गायमुख चौक, आंबेगाव बुा पुणे येथे एक इसम भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५१/२०२४, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील टॅम्पो घेवुन थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गायमुख चौक, आंबेगाव बुगा पुणे येथे जावुन तेथुन इसम नामे संदीप संजय काळवणे, वय ३४ वर्षे, रा. फ्लॅट नंबर १०८, सदगुरु बी/१ कप्लसृष्टीजवळ, दळवीनगर, आंबेगाव बु, पुणे, मुळ गाव मुपो शिरनाळ, ता. चाकुर, जि. लातुर हा त्याचे ताब्यात १० लाख रुपये किं चा अशोक लेलंन्ड कंपनीची चारचाकी टेंम्पो, याचेसह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा गुन्हा जप्त करुन त्यास नमुद गुन्हयात दिनांक ०५/०६/२०२४ रोजी अटक केली आहे.
सदरची कामगिरी, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील मा सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे. नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार अवधुत जमदाडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, नामदेव रेणुसे, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, विक्रम सावंत, राहुल तांबे, यांच्या पथकाने केली आहे.