(KP) पुणे
सरकार कोणाची असो पण सरकारी नोकरदार तेच असतात त्यांच्या काम करायचं पद्धत काही बदलत नाही. वरिष्ठ अधिकारी कितीतरी येऊन जातात पण त्यांच्या हाताखाली काम करणार नोकर वर्ग तेच असतं अशी आपण प्रत्येक ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल की किती सरकार बदललं तरी काय होणार नाही सरकारी काम सहा महिने थांब अशी एक म्हणणं आहे. आज पुण्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचे विचार केला तर कमिशनर अमीतेश कुमार साहेब रुजू झाल्याबरोबर पुण्यामध्ये सर्व नामवंत गुंडांना पहिलाच दिवशी कमिशनर ऑफिसला हजेरी लावण्यासाठी बोलवून घेतले पण सर्व लोकांना वाटत होतं कमिशनर खूप कडक आहे सर्व दोन नंबरचे धंदे ताबडतोब बंद केले. आता तरी सर्वांना वाटलं कमिशनर साहेब चांगले आहेत त्यांच्या नावाला कलंक म्हणून बड्या बापाच्या मुलाने पोर्ष गाडीने दोघांना चिरडून टाकली. यामुळे सर्व पोलिसांचा नावाला काळीमपासला गेला. आता जेमतेम एक महिन्यानंतर पुण्यामध्ये सर्व दोन नंबरचे धंदे गल्लीबोळामध्ये लपून छपून चालू आहेत मुळात हातभट्टी दारू बंद झालेच नाही. मटका बंद झालाच नाही. म्हणावे लागेल.
खडक पोलीस स्टेशन अंतर्गत नंदू नाईक हा खूप मोठा मटका चालवणारा बुकी आहे. फडगेट पोलीस चौकीचे शेजारी दत्त मंदिर च्या या ठिकाणी नंदू नायक यांचा मटक्याचा धंदा खुलेआमपणे चालू आहे या ठिकाणी आदेश जनतेचा या साप्ताहिकाचे संपादक व सहाय्यक संपादक या दोघांनी या ठिकाणी जाऊन व्हिडिओ काढून फडगेट पोलीस चौकीचे पी आय सोनवणे साहेब यांना भेटून व्हिडिओ दाखवला आम्ही. पण ते म्हणाले आपल्या इथे कुठल्याही धंदा चालू नाही पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी धंदा चालू होतं. साहेबांना कळकळीची विनंती केल्यानंतर पी आय सोनवणे साहेब म्हणाले मी स्वतःहून लक्ष घालून धंदा चालू असेल तर धंदा बंद करतो म्हणून आश्वासन दिले.