3G
दिनांक ०७/०६/२०२४ रोजी मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री प्रविण पवार, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे यांनी पुणे शहरातील ई सिगारेट व वेब याची विक्री करणारे यांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. श्री सुनिल तांबे, सहा पो आयुक्त, गुन्हे १.व मा. श्री. सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शना खाली पुणे शहर गुन्हे शाखे कडील सर्व युनिटचे अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन दिनांक ०७/०६/२०२४ रोजी दिवसभर विशेष अभियान राबवुन पुणे शहरामध्ये ई सिगारेट, वेब व तंबाखुजन्य फ्लेवर यांची विक्री करणारे एकुण १८ वेगवेगळ्या ठिकाणी छापा कारवाई करुन एकुण २१ आरोपी यांना ताब्यात घेऊन त्याचेकडुन एकुण १०,६७,५९४/- रक्कमेची ई सिगारेट, वेब तसेच तंबाखुजन्य फ्लेवर जप्त करण्यात आले असुन सदर आरोपी यांचे विरुध्द सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ७ (२), २० (२) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. सदर छापा कारवाई मध्ये सातत्य ठेवुन ई सिगारेट, वेब, तंबाखुजन्य फ्लेवर यांची विक्रीकरणारे यांचे समुळ उच्चाटण करण्यात येणार आहे.