3G
पर्वती पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. १९०/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२,३४ प्रमाणे दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी रा. हनुमान मंदिराजवळ पर्वती पायथा पुणे हे रस्त्याने पायी जात असताना त्याचे पाठीमागुन येणा-या तपकीरी (मरुन) रंगाचे सुझुकी बर्गमॅन या दुचाकी वरील अज्ञात दोन मुलांनी फिर्यादी यांचे हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावुन घेवुन चोरुन नेला होता. दाखल गुन्हयाचा पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे व पोलीस मित्र दिनेश परीहार यांनी तांत्रीक तपास करुन दाखल गुन्हयात आरोपी नामे शादाब मेहबुब सय्यद वय २२ वर्षे रा. वाडकरमळा, मोमिन दवाखान्या समोर, सय्यद नगर, हडपसर पुणे त्याचा विधीसंर्घग्रत बालक साथीदार याचे कडुन एकुण ०८ मोबाईल फोन व बर्गमॅन मोपेड मोटार सायकल जप्त केली असुन आरोपी यांनी फरासखाना, खडक, विश्रामबाग, मुंढवा, व इतर भागातुन मोबाईल चोरी केल्याचे सांगत आहेत.
कोणाचे मोबाईल फोन चोरी गेले असतील तर पर्वती पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा. गुन्हयात जप्त केलेल्या मोबाईल फोनचे वर्णन खालील प्रमाणे
१. वन प्लस कंपनीचा मोबाईल त्याचा आएमईआय नंबर ८६०९५७०६२३३००१४,
२. ओप्पो कंपनीचा मोबाईल त्याचा आएमईआय नंबर ८६८३०१०३६६४०३९/२१
३. ओप्पो कंपनीचा मोबाईल त्याचा आएमईआय नंबर ८६६१३२०६६३६१९७७/६९,
. विवो कंपनीचा मोबाईल त्याचा आएमईआय नंबर मिळून येत नाही,
४ ५. रेअलमी कंपनीचा मोबाईल त्याचा आएमईआय नंबर ८६२९०२०६८०३१३७०/६२
६. एक्सोमी कंपनीचा मोबाईल त्याचा आएमईआय नंबर ८६३५४००४४४०३७९९.
७. विवो कंपनीचा मोबाईल फोन त्याचा आयएमईआय नं. ८६८४९३०३६१७१४१९/०१, व
८. विवो कंपनीचा मोबाईल फोन त्याचा डिस्प्ले बंद असलेला मोबाईल फोन असे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस उप आयुक्त परि-३ श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगडरोड विभाग पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, कुंदन शिंदे, अमित चिव्हे, सुर्या जाधव, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे- पाटील, अमोल दबडे, सद्दाम शेख, यांनी केली आहे.