(KP)
पुणे.
पुणे शहरामध्ये गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी केवळ गुन्हेगारी वरच नाही तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. जर वाहतूक पोलिसांनी नागरिकांकडून विनाकारण पैसे घेतले तर आता पोलिसांचा वरच खंडणीचा गुन्हा दाखल होणार आहे.
यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. पोलिसांवर वचक ठेवण्यासाठी पोलीसआयुक्तांनी हे पाऊल उचललं आहे. दरम्यान पोलिसावर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. हे कर्मचारी साध्य वेशात वाहनचालक म्हणून शहरात वेगळवेगळे भागात गस्त घालणार आहेत.
हे फक्त काम आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांचा. पद्मावती या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना चिरमिरी घेताना फोटो काढला आहे ती फोटो डायरेक्ट माननीय आयुक्तांकडे पाठवलेला आहे त्यामुळे आयुक्तांनी ही पाऊल उचललेला आहे. पुणे पोलीस आयुक्त साहेब असे म्हणतात की वाहन चालकांकडून लाच किंवा चिरमिरी घेताना आढळून आल्यास संबंधित वाहतूक पोलीस अधिकार्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. असा इशारा वाहतूक पोलिसांना पोलीस आयुक्तांनी आदेश दिला आहे. पुणे पोलीस आयुक्त पुढे म्हणतात की वाहतूक पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरी मिरी घेतात का? त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात का? याची पथकाकडून चौकशी केली जाणार आहे. गैरप्रकार आढळून आल्यानंतर तात्काळ संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितला आहे.
पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा गंभीर समस्या बनलेला आहे. वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलिसांकडून गाड्या उचलणे किंवा वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात पोलीस कर्मचारी मग्न असल्याचे दिसून येतात.
अनेकदा पोलीस चौकात न थांबता आडबाजूला थांबलेले दिसून येतात. पोलीस कर्मचारी आडबाजूला थांबून वाहन चालकांना अडवून त्यांना कायद्याची भीती दाखवून कारवाईला सुरुवात करतात. घाबरलेला वाहन चालकाकडून मोठ्या रकमेची मागणी करून त्यांच्याकडून चिरी मिरी घेऊन त्यांना सोडून देतात असे आयुक्तांना समजलेला आहे. आदेश न्यूजपुणे