(KP) पिंपरी चिंचवड
न्यू थेरगाव हॉस्पिटल येथे महिला सुरक्षा रक्षकाला शरीर सुखाची मागणी करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या मालक व सुपरवायझर दीपक वाघ तसेच त्यांना सहकार्य करणारे साथीदारांवर कडक कारवाई करून व नॅशनल सेक्युरिटी सर्विसेस कामगारांच्या शोषण केल्याने काळा यादी नाव टाकावे
सदरील कंत्राटदाराची सखोल चौकशी करून नॅशनल सेक्युरिटी सर्विसेस वर कडक कारवाई करावी, कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिका वर घेण्यात येणार आहे. हे आंदोलन नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी केले.
याप्रसंगी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत. पश्चिम महाराष्ट्राचे नेते सिकंदर सूर्यवंशी.चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष स्वप्निल कसबे. सामाजिक कार्यकर्ते नितीन पटेकर ,कामगार नेते विनोद चांदमारे ,महिला कार्यकर्त्यांना अनुषाताई सोनवणे ,डोंगरे ताई ,सुरेश आठवले ,शरद फडतरे ,राजू उबाळे ,दादा शिरोळे इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आदेश न्यूज पुणे