( अकबर मेमन प्रतिनिधी )
पुणे संतोष नगर.
धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विरोधी पथकाच्या प्रमुख सोनार साहेब यांच्या टीमने आज संतोष नगर कात्रज भाजी मंडई या ठिकाणी असणाऱ्या अतिक्रमण हटवून सामान्य लोकांना जाणे येण्यासाठी जागा मोकळी करून दिले.
पण अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आलेली नाही. जे दुकान समोर अतिक्रमण वाढलेले होते ते फक्त पत्रे काढून टाकण्यात आले. पण त्याच्या खाली बांधण्यात आलेलं वट्टा व बांधकाम पाडलेले नाहीत.त्यामुळे परत संध्याकाळी हाय त्या ठिकाणी पत्रे वगैरे लावून अतिक्रमण जसा होता तसेच बनवतील. ही अतिक्रमण हटवणार अधिकाऱ्यांना माहिती असायला पाहिजे होता. पण अतिक्रमण अधिकारी नावापुरते कारवाई केलेले दाखवलं आहे .
ट्राफिकचा समस्या वाढत असून रस्त्यामध्ये बंद पडलेले गाड्यां रस्त्याच्या कडेला उभा करून लोक निघून जात असतात त्यामुळे ट्रॅफिकला अडथळा निर्माण होतो आणि दुकान च्या समोर भला मोठा पत्रा शेड उभा करून दुकान समोरची जागा भडकवायचे काम दुकानदाराने करत असतात त्यामुळे या ठिकाणी फुटपाथ वर सुद्धा अतिक्रमण वाढलेले आहे. त्यामुळे वेळोवेळी अतिक्रमण अधिकारी अशी कारवाई करण्याचे गरजेचे आहे. अशी कारवाई केल्यामुळे सामान्य लोकांना रस्त्यावरून फिरत असताना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी महानगरपालिका क्षत्रिय कार्यालय मार्फत घेतली गेली पाहिजे आदेश न्यूज पुणे