(KP) लातूर
मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांचा होता. लातूर एमआयडीसी पोलीस स्टेशनला घेरावा.. लाखोंची संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले होते. दारू गोवा गुटखा इतर सर्व दोन नंबरचे धंदे त्वरित बंद करण्यासाठी रस्ता रोको व बोंबाबोम आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सर्वांना उद्देशून बोलताना पोलिसांच्या समोर पोलिसांना धारेवर धरले. यावेळी पोलिसांनी आंदोलनाचे आक्रोश पाहून पोलीस स्टेशनचे मेन गेट बंद करून घेतले.पोलिसांनी घेणारे सर्व हप्ते बंद करून सर्व दोन नंबरचे धंदे त्वरित बंद करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले असे होत नसेल तर आठ दिवसांमध्ये मंत्रालय समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशी म्हणाले राष्ट्रीय अध्यक्षांनी पोलिसांना उद्देशून बोलताना सांगितले. ही आंदोलने प्रत्येक शहरांमध्ये या पुढील काळामध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर आंदोलन होत राहणारा आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन जाग व्हावे आणि कामाला लागावे.कडक कायद्याचा अंमलबजावणी करावे.अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.पोलिसांना भेट म्हणून कोंबडा दारूच्या बाटल्या विमल गुटख्याच्या पुड्या महिलांनी टोपल्यामध्ये भरून लातूर एमआयडीसी पोलिसांना निवेदन बरोबर द्या भेट वस्तू दिले. पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल अशी राष्ट्रीय अध्यक्षनी सर्वांना उद्देशून बोलत होते सर्व कार्यकर्त्यांना आपल्या शहरांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अशी दोन नंबरचे धंदे चालू द्यायचं नाही. त्यांच्यासमोर तीव्र आंदोलन करा सर्व दोन नंबरचे धंदे बंद पाडा अशी आदेश देण्यात आली
यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील महेश शिंदे पाटील विभागीय अध्यक्ष गणेश गोरख घाडगे प्रदेश माहिती अधिकार अध्यक्ष व महिला प्रदेश अध्यक्ष राणीताई स्वामी तसेच महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यामधून कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आदेश न्यूज पुणे