(KP) पुणे
पुणे शहरातील कात्रज भागातील हॉटेल व्यवसायिकांकडून 5 लाखाची खंडणी उकळणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
13 जून 2024 रोजी हा कालावधीत कात्रज भागात घडला आहे. याबाबत विश्वनाथ पद्मनात पुजारी ( वय 57 रहा अमित असोसिएट्स आंबेगाव नऱ्हे रोड कात्रज ) यांनी गुरुवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. नमस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल सुनील शिंदे ( वय 30 ) सिद्धार्थ राहुल रणपिसे ( वय 28 ) दोघे राहणार समता सोसायटी सहकार नगर पुणे. यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे कात्रज परिसरात बार रेस्टॉरंट आहे. आरोपी शिंदे आणि रणपिसे कात्रज चौक परिसरामध्ये रेस्टॉरंट आणि बार मालकांना भेटले. तुम्ही बेकायदा व्यवसाय करत आहात. हॉटेलला पार्किंग व्यवस्था नसल्याचे आरोपींनी त्यांना सांगितले. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागात आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार देणार असल्याची धमकी दिली. फिर्यादी पुजारी यांचा सह कात्रज भागातील हॉटेल व्यवसायिकाकडून धमकून प्रत्येकी 2लाख रुपये खंडणी आरोपीने मागितली. खंडणी न दिल्या जीवे मारण्याचे धमकी दिली. नंतर फिर्यादी यांच्यासह इतर हॉटेल चालकाकडून भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुजारी यांच्याकडून पाच लाख रुपये खंडणी घेणाऱ्या शिंदे व रणपिसे यांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस धीरज गुप्ता पुढील तपास करत आहेत
आदेश न्यूज पुणे