(KP) पुणे
सिंहगड रस्ता परिसरात नऱ्हे भागात एका गोदामावर पुणे सामाजिक सुरक्षा विभाग व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. १ कोटी 39 लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून एकाचा शोध घेण्यात येत आहे. पुष्पेन्द्र अकबाल सिंग वय 27 राहणार नऱ्हे मूळ उत्तर प्रदेश. मुकेश काळूराम घेहलोत वय 28 राहणार आंबेगाव मूळ राजस्थान
चंदन अजयपाल सिंग वय 32 राहणार आंबेगाव मूळ उत्तर प्रदेश. अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. निलेश ललवानी वय 40 राहणार आंबेगाव याच्या विरोध गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे. राज्यात गुटखा बंदी आहे तरी प्रत्येक पान टपरीवर गुटखा विकली जातं त्याला मुख्य कारण म्हणजे पोलीस… प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अशी लोकांकडून हप्ते वसुली केली जातात म्हणून बंदी असलेलं गुटखा महाराष्ट्र मध्ये खुलेआमपणे विकली जाते . तरी पोलीस प्रशासन सहा महिन्यातून एक कारवाई केलेली दाखवले जातात . सिंहगड रस्ता भागातील एका गोदामा मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुटखाच्या साठा असून तिथूनच किरकोळ विक्रेत्यांकडे पाठवण्यात येत आहे अशी खबर पोलिसांना मिळाली.सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोन चे पथकाने शनिवार रात्री छापा टाकत 1 कोटी 39 लाख रुपयांचे गुटखा जप्त केला. पोलीस आयुक्त अमीतेश कुमार अप्पर आयुक्त शैलश बलकवडे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. आदेश न्यूज पुणे