((KP) लोणी काळभोर
पुणे जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षापासून इंधन चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर येथील इंधन माफिया टोळीचा प्रमुख सूत्रधार प्रवीण मडिखंबे सहा 7 साथीदारांना पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार कारवाईकरण्यात आली. असल्याचे माहिती लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.
प्रवीण मडीखंबे सहा 7 जाणवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी तडीपारचा प्रस्ताव तयार करून हडपसर परिमंडळ पाच च्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या माध्यमातून पोलीस उपआयुक्त आर राजा यांनी आरोपींच्या तडीपारचा प्रस्तावना मान्यता देऊन आरोपीला पुणे शहर पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्र पोलीस कायदा हद्दपार क्रमांक 55 प्रमाणे हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपींचे नाव
प्रवीण मणीखंबे (2) वर्ष कालावधी विशाल धायगुडे(1) वर्षा. बाळू चौरे (1 वर्षा ) इसाक मच कुरी (2 वर्षा ) संकेत शेंडगे(1 वर्षा ) नवनाथ फुले(18 महिने) आतिश काकडे (1 वर्षा ) अशी तडीपार केल्यांची नावे व कालावधी आहेत..
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे दत्ताराम बागवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार तेच भोसले, पोलीस हवालदार संदीप धनवटे, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, यांनी केली.