(उपसंपादक गणेश गोरख घाडगे)
पुणे..
पुणे रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या रहिवासींचा सुविधेसाठी, तसेच रात्री येणाऱ्या, रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना, सुरक्षा व सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने, प्रीपेड ऑटो रिक्षा थांबा ही संकल्पना राबविण्यात आली होती. ती काही कारणास्तव बंद झाली होती. ती नव्याने सुरू करण्यात येत आहे. दिनांक 18 /6/24 रोजी प्रीपेड ऑटो रिक्षा थांबा योजना राबविण्याच्या अनुषंगाने प्रीपेड ऑटो रिक्षा प्रवासी सेवा संस्था पुणे यांची बैठक पार पाडली यामध्ये पुणे शहरांमध्ये पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुरू असलेली, प्रीपेड ऑटो रिक्षा सुरू करण्याचे योजना ठरवण्यात आले आहे. त्यानुसार पुणे प्रीपेड ऑटो रिक्षा थांबा बूथ प्रावेट तत्त्वावर सुरू करण्याचे प्रस्ताव सादर करणे आहे.
पुणे रेल्वे स्टेशन येथे सदर बाबत रिक्षा संघटना व प्रत्येक ऑटो रिक्षा संघ यांच्या समन्वयाने नमूद प्रायोगिक योजना सुरू करीत आहे. महाराष्ट्र शासन गृह विभाग, एम व्ही ए 0196/871CR37/TRA2 दिनांक27/9/96 चे नोटिफिकेशन अनुसार मोटार वाहन कायदा कलम 115/116(1)(A)B116(4) आणि 117 अन्वये वाहतूक शाखा उपायुक्त या अधिकाराचा वापर करून सदर योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करीत आहोत. सदर प्रीपेड ऑटो रिक्षा योजनेचे तांत्रिक व नियोजन करण्या कामी, पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा, येथे प्रस्ताव मागवीत आहोत. तरी सदर योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यास उत्सुक असणाऱ्या, संघटना,संस्था, किंवा कंपनीने, आपले प्रस्ताव 22 /6/24 पूर्वी सादर करावे अशी आदेश श्री रोहिदास पवार पोलीस उप आयुक्त वाहतूक विभाग पुणे शहर यांनी आदेश दिला आहे.