आदेश न्यूज नेटवर्क
पुणे जिल्हा.
केसनंद रस्ता परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी दिली आहे. शेअर ट्रेडिंग मध्ये नफा मिळविण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून एकूण 45 लाख रुपये उकळले. त्यानंतर कोणताही परताव न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणात पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर करीत आहेत.
दुसरा एका प्रकरणामध्ये वाघोली परिसरात राहणारे 38 वर्षे व्यक्तीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. आयपीओ काढून देतो आणि स्टॉक मार्केट टिप्स मार्फत आर्थिक फायदा करून देतो, असे सांगत फिर्यादी कडून सहा लाख 87 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर करीत आहेत.