आदेश न्यूज नेटवर्क
तुळजापूर.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती धाराशिवल यांच्यावतीने बुधवारी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विरोधात व्हीआयपी पास मध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जन आंदोलन करण्यात आले. गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाठपुरावा करून सुद्धा प्रशासनास जाग येत नसल्याने, साडी चोळी बांगड्या व भेटवस्तू देऊन यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानाचे तहसीलदार सोमनाथ वाडकर लवकर ते लवकर या विषयावर कारवाई केली जाईल असा आश्वासन देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय कडून सीसीटीव्ही चेक करून तपासले जाईल, व
कारवाई केली जाईल, असे पत्र दिले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर,आबासाहेब कापसे,चंद्रकांत गायकवाड, आनंदराव भालेराव, पंचाक्षरी चव्हाण, मीनाताई सोमजी, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.